केंद्रीय तरतुदीं विरोधात खासगी क्लासेसचा आंदोलनाचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारच्‍या शिक्षण विभागाने‎ खासगी क्‍लासेससंदर्भात जारी‎ केलेल्‍या अध्यादेशातील काही ‎‎तरतुदींविराेधात क्‍लासचालकांनी ‎एल्गार पुकारला आहे. या‎ तरतुदींविराेधात आंदोलन व ‎न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही ‎‎क्‍लासचालकांनी घेतला आहे.

क्लासचालकांची पुढच्या‎आठवड्यात शहरात राज्‍यस्‍तरीय‎ बैठक हाेत असून यात आगामी‎धोरण निश्‍चित केले जाईल, अशी‎माहिती कोचिंग क्‍लासेस संचालक‎संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पत्रकार परिषदेत दिली. मुळे यांनी‎सांगितले की, शासनाकडे‎क्‍लासचालकांची कुठलीही नोंद‎करून घेतली जात नाही. मग‎प्रस्‍तावित अध्यादेशात नोंदणी रद्द‎करण्याचा मुद्दा गोंधळ निर्माण ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎करणारा आहे. वयोमर्यादेसंदर्भात‎ अटीमुळेही क्‍लासचालकांमध्ये‎गोंधळ उडाला आहे. पत्रकार‎परिषदेस सरचिटणीस सीए लोकेश‎पारख, राज्‍य प्रतिनिधी रवींद्र पाटील आ‎दी उपस्थित हाेते.‎

  • केंद्र किंवा राज्‍य शासनाने‎क्‍लासेससाठी नियमावली‎ करावी.‎
  • सक्षम अधिकारी नेमताना‎क्‍लासेसची नोंदणी करावी.‎
  • छोटे, मध्यम क्‍लासेस‎संचालकांचा विचार करावा.
  • १६ वर्षांआतील विद्यार्थ्यांना‎प्रवेश न देण्याचा मुद्दा स्‍पष्ट ‎व्‍हावा.‎
  • आसनव्यवस्थेबाबत नियम‎अवास्‍तव असल्‍याचा दावा.‎
  • विद्यार्थी संख्या, शुल्‍क‎आकारणीचा उल्‍लेख नाही.‎

Protected Content