पाचोरा, प्रतिनिधी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे पाचोरा बस आगारात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अँड आऊटरिच प्रोग्राम” या ४५ दिवसांचा कार्यक्रमाचे दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज दि. ३ आॅक्टोबर रोजी पाचोरा बस स्थानक येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश वरिष्ठ नागरिकांना कायदेविषयक दिल्या जाणाऱ्या सेवा हा होता. याप्रसंगी वरिष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या कायदेविषयक सेवा सुविधा याबाबत अॅड. प्रशांत नागणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. अरुण भोई यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पाचोरा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. रविंद्र पाटील, न्यायालयीन कर्मचारी दिपक तायडे, सचिन राजपूत, पाचोरा बसस्थानक आगारातील सहाय्यक वाहतूक अधिक्षक सागर फिरके, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश पाटील, वाहतूक नियंत्रक लतिफ शेख, ज्ञानेश्वर चौधरी, विनोद पाटील, एम. आर. पाटील, शंकर चौधरी, काशिनाथ पाटील तसेच विधी शाखेचे विद्यार्थी सौरभ विसपुते, तुषार नैनाव, गोकुळ पाटील तसेच सह अधिकारी व कर्मचारी तसेच न्यायालयातील कर्मचारी विधी शाखेचे विद्यार्थी न्यायालयीन कर्मचारी, विधी शाखेचे विद्यार्थ्यांसह आदींनी परिश्रम घेतले.