एरंडोल-पारोळा तालुक्यातील रस्त्यांसाठी १६ कोटींची मंजूरी; आ. चिमणराव पाटीलांचा पाठपूरावा

पारोळा प्रतिनिधी । एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती तसेच नव्याने रस्ते बनवण्याकामी आ. चिमणराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून एकूण १६ कोटींच्या रस्त्याच्या कामांना मंजूरी मिळाली आहे.

गेल्या वर्षभरापासून प्रस्तावित असलेले व अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात देखील अनेक रस्ते खराब झाले असून रस्त्यांवर खूप मोठे खड्डे व काही ठिकाणी भराव वाहून गेल्याने व साइड पट्ट्या देखील नसल्याने रस्त्यावरून वाहन चालवणे खूप जिकरीचे व कसरतीचे झाले होते.

ग्राम विकास मंत्री हसन मूश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करत १६ कोटीच्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळवली आहे. यात तांडे ते निपाणे ते आनंदनगर तांडा रस्ता ३.५७ की.मी. अंदाजित रक्कम २०६.७ लक्ष, तांडे ते रामा २५ ते नांदखुर्द नांदखुर्द बू. रस्ता २.४९ की. मी. अंदाजित रक्कम १७५.४५ लक्ष, कासोदा फरकांडे फाटा ते फरकांडे रस्ता ३.१८ की. मी. अंदाजित रक्कम २१९.६३ लक्ष, पारोळा ते वंजारी खू रस्ता १.५६ की. मी. अंदाजित रक्कम ९८.०२ लक्ष, रामा ०१ ते बोदर्डे रस्ता १.६० किमी अंदाजित रक्कम ९८.३३ लक्ष, ढोली वेल्हाणे ते करमाड बू. रस्ता ३.२४ कीमी. अंदाजित रक्कम ३१०.८७, मोरफळ ते पळासखेडा सीम ते नगांव रस्ता ४.०६ किमी. अंदाजित रक्कम २३९.०५, रामा ०६ ते सांगवी विटनेर रस्ता ०.९० किमी. अंदाजित रक्कम ८१.७९, रामा ०६ सारवा ते बाहूटे रस्ता २.८५ किमी. अंदाजित रक्कम १९१.१२ ह्या रस्त्यांचा समावेश आहे.

Protected Content