शिवसेना-संभाजी ब्रिगेडतर्फे रामदास कदम यांचा जाहीर निषेध

पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबाबाबत केलेल्या निराधार वक्तव्याचा निषेध करत आज सकाळी ११:३० वाजता शहरातील शिवतीर्थ कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाचोरा तालुका शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रामदास कदम यांच्या पुतळ्याला बांधून, चपलांचे हार घालून, पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण साहेबराव पाटील, तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, दत्तात्रय जडे, खंडु सोनवणे, उपशहरप्रमुख अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पु राजपुत, संदिप जैन, पप्पु जाधव, प्रविण मोरे, हरीष देवरे, अतुल चौधरी, संजय चौधरी, नाना वाघ, रविंद्र चौधरी, राजेंद्र राणा, अजय पाटील, अमरसिंग पाटील, अनिस अन्वर, देविदास पाटील, अनिल मराठे, विलास पाटील, प्रितेष जैन, धनराज पाटील सह शिवसेना, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तद्नंतर रामदास कदम यांच्या निषेधाचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले.

Protected Content