धक्कादायक : मोठ्या भावाच्या विरहाने लहान भावाचा मृत्यू !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील निंभोरी खुर्द येथे ३३ वर्षीय तरूणाचा अल्पशा आजाराने निधन झाले होते. मोठ्या भावाचा मृत्यूचा धसका घेवून लहान भावाचा देखील ४८ तासांच्या अंतरात मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील निंभोरी खुर्द येथील माजी पोलिस पाटील कै. तुळशिराम नारायण दिवटे यांचा मोठा मुलगा गजानन तुळशिराम दिवटे (वय – ३३) याचे मंगळवारी २० रोजी पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा लहान भाऊ राहुल तुळशिराम दिवटे हे गेल्या सहा महिन्यांपासून आजाराशी झुंज देत असतांना मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्याचा धसका घेऊन राहुल दिवटे (वय – ३१) यांचे गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ३ वाजता अवघ्या ४८ तासांच्या अंतराने निधन झाले. गजानन दिवटे यांच्या सारीचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता आटोपल्यानंतर दुपारी बारा वाजता राहुल यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे निंभोरी गावावर शोककळा पसरली आहे. गजानन यांचे पश्चात आई, एक मुलगा, एक मुलगी, तर राहुल यांचे पश्चात आई, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

Protected Content