पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात उन्हाळी वर्गास प्रारंभ

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी वर्गाला सुरूवात करण्यात आली आहे.

 

शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शुभारंभ सोहळ्यात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रेरणा वडाळे या विद्यार्थिनींनी यावेळी ‘माय सावित्री तू महान ‘हे प्रेरणा गीत सादर करून साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले. गायत्री घोंगडे आणि तृप्ती घोंगडे या विद्यार्थिनींनी वर्गाच्या वतीने मुख्याध्यापिकांचा सत्कार केला. यावेळी ‘एकच ध्यास सर्वांगीण गुणवत्ता विकास’ या ध्येयाने प्रेरित होऊन दहावीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे  सांगितले. हरीभाऊ राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि दहावीच्या उंबरठ्यावरील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्गशिक्षक शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले. बी. एन. जाधव यांनी आभार मानले.

Protected Content