टाकरखेडा शाळेत निरोप समारंभ व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थांसाठी व पदोन्नतीने बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर देवानंद डाकोरकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच धर्मराज शिंदे, माजी सरपंच समाधान पुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील,  पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, उपाध्यक्ष रूपाली आगळे, केंद्रप्रमुख विकास वराडे, मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी उपशिक्षक देवाजी पाटील व रविंद्र चौधरी यांची ग्रेडेड मुख्याध्यापक  म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  शाल, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन करण्यात आला. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्या कडून बनवून घेतलेल्या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनात मातीच्या व कागदाच्या आणी पुठ्यांच्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू मांडण्यात आल्या होत्या. उपस्थितांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतूक केले.

 

याप्रसंगी नैतिक भोई, प्रतिज्ञा लोहार, जया भोई, मयुरी सुरळकर या विद्यार्थांनी तसेच  देवाजी पाटील, जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जयंत शेळके यांनी केले व आभार रामेश्वर आहेर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक तसूच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content