पहूर परिसरात मुसळधार पाऊस; वाघूर नदीला पूर, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूरसह परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आले. शेत शिवारातील नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांचे पिकांसह शेतच वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे .

आज सकाळपासूनच पाण्याची रिपरिप सुरू होती .दुपारी दोनच्या सुमारास तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले . खर्चाने शिवारातील मोतीलाल नथ्थू घोंगडे यांच्या शेतात जवळून वाहणाऱ्या नाल्याने नैसर्गिक प्रवाह बदलल्याने त्यांच्या शेतातूनच  पाणी वाहू लागले. यामुळे मिरची , चवळी , डिंगरी भाजीपाल्या सह शेतजमीन वाहून गेली . तसेच ईश्वर  बनकर , माधव धनगर  आदी शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान झाले . महसूल विभागाने त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे .

 

 

वाघूर नदीला आला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीतुन उगम पावलेल्या पुर्वीची व्यासगंगा व आताची वाघूर नदीला  काल रात्रभर तर आज संपूर्ण दिवसभर सुरू  असलेल्या जोरदार पावसाने वाघूर नदीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पुर आला असून नदि, नाले दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या मटण मार्केट, तसेच पहूर पेठ येथील बाजार पट्यातील अतिक्रमित  अनेक दुकानांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. तर गावात अनेक ठिकाणी, तर संतोषी माता नगर, गोविंद नगर  याठिकाणी परिसर जलमय झाला होता. सर्वत्र पाणीच पाणी साचले होते.

नदी किनाऱ्यावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा

कालपासून अजिंठा डोंगर रांगेत मुसळधार  पर्जन्य वृष्टी होत असल्याने वाघुर नदी काठावरील वाकोद, पिंपळगाव, हिवरी – हिवरखेडा, पहूर पेठ, पहूर कसबे, खर्चाणे,  नेरी आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सावधान गीरी बाळगण्याचे आवाहन पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे  यांनी केले आहे .

 

Protected Content