सीएमसीतर्फे धाडसी सुनील मराठेंच्या सत्कार

यावल प्रतिनिधी । पूरग्रस्तात सुनील मराठे यांनी मोठे धाडस दाखवत नदीच्या भर प्रवाहात ट्रकच्या छतावर अडकलेल्या ७ वर्षीय बालकाचा जीव वाचवला असून त्यांच्या धाडसाचे कौतूक करत सीएमसीतर्फे सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ढगफुटीमध्ये अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली. यात अनेक लोकांचे जीव संकटात देखील आले, यात अनेक मावळ्यांनी स्वतःचे जीव संकटात टाकून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यातीलच एक म्हणजे आपले मराठा बांधव सुनील मराठे यांनी मोठे धाडस दाखवत नदीच्या भर प्रवाहात एका ट्रक च्या टपावर अडकलेल्या एक ७ वर्षाच्या मुलाला ट्रकपर्यंत पोहत जाऊन सुखरूप बाहेर काढले.

याच प्रकारे त्यांनी नदीकाठच्या झोपडी पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्यात अडकलेल्या एका ७२ वर्षाच्या आजींना देखील पुराच्या पाण्यात पोहत जाऊन बाहेर काढले. याचप्रकारे त्यांनी या पूर परिस्थितीत अनेकांची वित्त/जीवित हानी टाळण्यासाठी कार्य केले.

यासाठी CMS – छत्रपती मराठा साम्राज्य गृप तर्फे त्यांच्या या साहस आणि माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कार्याला एक मानाचा मुजरा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी  जितेंद्र पवार,  शिवाजी पाटील,  उदयराम पाटील, सचिन पाटील,  गौरव चव्हाणसह इतर CMS सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!