रस्त्यावरील खड्डयांची ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | सावदा ते फैजपूरच्या दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या येथील रितेश पाटील यांनी थेट ‘आपले सरकार’ पोर्टलवर याची तक्रार केली असून डागडुजीची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या सावदा ते फैजपूर रोडची दुर्दशा झाली असून याचीच तक्रार रितेश पाटील यांनी केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, सावदा-फैजपूर रोड हा खूप रहदारीचा रोड असून केळी वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. सदरील रोड वर सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा चे कार्यालय असून त्या कार्यालयाच्या २००-३०० मीटर फैजपूर दिशेला हा रोड फक्त त्याच ठिकाणी दर वर्षी खराब होत असतो.रोड वर खूप मोठे मोठे गड्डे असल्याने पाऊसामध्ये ते गड्डी काळात नाही परिणारी अपघाताच्या घटना वाढत आहे. रोज इथे १-२ जण अपघात होऊन जखमी होत आहे. सादर ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी महाशय दुरुस्ती करून पुढे तिथे कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या  संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना रितेश पाटील म्हणाले की, या रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने याची डागडुजी करणे आवश्यक असल्यानेच आपण आपले सरकार पोर्टलवर याची तक्रार केली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!