चाळीसगाव : प्रतिनिधी । आडगाव येथे एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यात पाचव्यांदा चोरी झाली त्या शेतकऱ्याचा गोठा आता रिकामा झालाय ११ वेळा अशा पशुधनाच्या चोऱ्या होऊनही पोलीस आरोपींना शोधू शकलेले नाहीत . त्यामुळे वैतागलेल्या आडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आक्रोश केला
आडगाव येथील शेतकरी आबा पाटील यांच्या दोन गायी रात्री चोरी गेल्या, (आत्तापर्यंत याच शेतकऱ्याची ११ जनावरे चोरीला गेली आहेत ! ) पोलीस प्रशासन कारवाई करत नाही म्हणून चोरट्यांची हिम्मत वाढली आहे. शेतकरी रडकुंडीला आले आहेत आडगाव, देवळी, टाकळी प्रदे या मालेगाव रस्त्यालगत असणाऱ्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेले आहे. शेवटचा पर्याय म्हणून आता शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला आहे,
मंगेशदादा आमचा फक्त आपल्यावरच विश्वास आहे आपण आल्याशिवाय आम्ही रास्ता रोकोचे आंदोलन थांबवणार नाही, प्रशासनावरून आता आमचा विश्वास उठला आहे अशा शब्दात शेतकरी व आडगाव येथील ग्रामस्थांनी भावना मांडत आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आक्रोश केला.
आमदार मंगेश चव्हाण यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी दाखल होत शेतकऱ्यांना धीर दिला अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांना फोन करून गुन्हा दाखल करून लवकर सोक्षमोक्ष लावण्याच्या सूचना दिल्या संबंधित शेतकऱ्याला वैयक्तिक मदत म्हणून २५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.
आत्महत्या करण्यापेक्षा रस्ता रोको करणे हा पर्याय आम्हाला योग्य वाटला अशी संतप्त भावना नुकसानग्रस्त शेतकरी आबा पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील , पोलीस पाटील प्रभाकर पाटील, भूषण पाटील, पितांबर पाटील, विजय पाटील, सतीश पाटील, जयेश पाटील, भाऊसाहेब हिरे, जगदीश पाटील, भैय्यासाहेब पाटील ( पिलखोड) , दीपक पवार (टाकळी प्र दे), तात्या मगर, योगेश्वर रणदिवे (देवळी) , सुनील पाटील, नवल सूर्यवंशी, दिगंबर पाटील, संभाजी पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
देवळी येथे देखील पुंजु पाटील याच्या गोठ्यात गायीची चोरी झाली आहे, तेथे भेट देऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांना फोनवरून गुन्हा दाखल करून कारवाई करण्या सूचना दिल्या. याप्रसंगी प्रशांत पाटील, किसन सूर्यवंशी, बापूराव पाटील, अशोक पाटील, भारत पाटील, मांगो पाटील, विष्णू चौधरी उपस्थित होते.