जुन्या वादातून कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील देना नगर परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला आणि तिच्या मुलगा आणि सुन यांना परिसरात राहणाऱ्या सहा जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केली आहे. ही घटना बुधवारी १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली. या संदर्भात गुरुवारी १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील देना नगर परिसरात मुन्नीबाई हंसराज पाशी वय ५८ या महिला आपल्या मुलगा अभय आणि सून रिमझिम यांच्या सहवास्तव्याला आहेत. बुधवारी १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून या परिसरात राहणाऱ्या नलिनीबाई सुरवाडे, किरण सुरवाडे, ललित नेमाडे, अनिल सोनवणे, छाया सोनवणे, शितल सुरवडे यांच्यासह इतरांनी मुन्नीबाई पासी यांना आणि त्यांचा मुलगा आणि सून यांना लाकडी बॅट तसेच पाठीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच महिलांना केस ओढून ओढताणकरून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले. या संदर्भात मुन्नीबाई पासी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मारहाण करणारे नलिनीबाई सुरवाडे, किरण सुरवाडे, ललित नेमाडे, अनिल सोनवणे, छाया सोनवणे, शितल सुरवाडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ तेजस परिसर करीत आहे.

Protected Content