पदवीधर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाडणार

 

औरंगाबाद : वृत्तसंस्था । भाजपा हा उन्मादी पक्ष असून पदवीधर निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवाराला हरवण्यासाठी काम करणार असल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी सांगितले

भाजपाला मराठाड्यामध्ये मोठा धक्का बसला असून पक्षाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपण राजीनामा पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवलं आहे. बारा वर्षे मी भाजप नेत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांनी मला कोणतीही जबाबदारी दिली नाही व जवळही केले नाही. राज्यातून औरंगाबादमध्ये येणारे नेते माझ्या घरासमोरून जात होते पण मला कोणीही साधे बैठकीला बोलावत नसतं. त्यामुळे पक्षात राहून काय करू, असा प्रश्न असे राजीनामा दिल्यानंतर गायकवाड म्हणाले

दरम्यान, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दाखल केलेला अर्ज गायकवाड यांनी मागे घेतला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे भाजपचा पराभव करू शकतील म्हणून त्यांच्या मागे कार्यकर्ते उभे करू,” असे गायकवाड म्हणाले.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत जयसिंगराव यांनी काम केले होते. रामदासांचे श्लोक म्हणत त्यांनी भाजपचा प्रचार केला होता.

गेल्या काही वर्षांत गायकवाड विजनवासात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली तर उमेदवार असावा म्हणून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. भाजपच्या जाहिर कार्यक्रमात फारसे न दिसणारे जयसिंगराव गायकवाड यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मतांच्या ध्रुवीकरणाचा भाग आहे, असे मानले जात आहे. मागील दहा वर्षांपासून सातत्याने पक्षाकडून मला डावललं जात होतं त्यामुळेच मी निराश होतो. अखेर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केल आहे.

मराठवाड्यामध्ये पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे पदवीधर मतदारसंघासाठीचे उमेदवार शिरीष बोराळकरांपुढील अडचणी वाढल्या आहेत. गायकवाड हे मराठवाड्यातील प्रमुख स्थानिक नेत्यांपैकी एक आहेत. गेल्या वेळी निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे विस्कळीत झालेल्या प्रचार यंत्रणेमुळे शिरीष बोराळकर यांना पराभूत व्हावे लागले होते. आता बोराळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांच्यावर पडली आहे. गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे पदवीधरची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Protected Content