शेतकऱ्यांच्या पशुधनावरील लंपी साथरोगावर तातडीने प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत निवेदन 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आता पर्यंत या रोगामुळे संपूर्ण देशभरात लाखो जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच आता जळगांव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर लंपी या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे.

या पार्श्वभूमीवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल जावळे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे केली आहे.

लंपी एक संसर्गजन्य रोग असून, तो प्राण्यांमध्ये जलद गतीने पसरणारा आजार आहे. यात प्रामुख्याने जनावरांच्या शरीरावर गुद्या येणे, ताप येणे, शरीरावर सूज येणे, चारा न खाणे या प्रकारचे लक्षण दिसून येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव जळगांव जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.यात यावल ,रावेर या तालुक्यातील काही ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

लंपी मुळे जनावरे दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. या रोगाचा प्रसार इतर तालुक्यात आणि जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर लंपी आजाराचे इंन्फेकशन कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत लवकरात लवकर उपाययोजना कराव्या व योग्य ते नियोजन करून जनावरांचे लसीकरण तातडीने करावे अशा प्रकारची मागणी स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल हरीभाऊ जावळे यांनी केली आहे.

Protected Content