भुसावळ, राजकीय

भुसावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी निधी

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी निधी मिळणार आहे.

आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना टप्पा २ या योजनेतून भुसावळ तालुक्यातील वराडसिम, गोजोरे, सुनसगाव, फेकरी, वांजोळा, महादेव माळ आदी गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. परंतु गावातील पाईप लाईन खराब झाल्यामुळे या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असते. या पार्श्‍वभूमिवर, येथील ग्रामस्थांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे गावांतर्गत नवीन पाईपलाईन साठी मागणी केली होती.

आमदार संजय सावकारे यांनी याची तात्काळ दखल घेऊन शासन स्तरावरून गोजोरे साठी ३० लक्ष , फेकरी ४० लक्ष , वराडसिम ३० लक्ष, सुनसगाव २६ लक्ष , वांजोळा २६ लक्ष , महादेव २७ लक्ष , तसेच नगरपालिका आणि बाहेरील भुसावळ ग्रामीण यशोदा हॉटेल मागील परिसरासाठी १ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे.

आपल्याला हे देखील आवडू शकते !


शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*