पंजाब ‘आप’ काँग्रेसमध्ये विलीन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आम आदमी पार्टीचे माजी नेते सुखपाल खैरा यांनी आपल्या पंजाब एकता पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची घोषणा केली. खैरा हे पंजाब विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत.

 

खैरा  म्हणाले की, आम आदमी पार्टी म्हणजे ONE MAN SHOW आहे. काँग्रेस सोडून आपण अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पक्षासोबत गेलो ही आपली मोठी चूक होती.

 

सुखपाल खैरा, भटिंडा जिल्ह्यातल्या माऊरचे आमदार जगदेव सिंग कमलू आणि बर्नाला जिल्ह्यातल्या भदौरचे आमदार पिरामल सिंह खालसा या तिघांनी काल राहुल गांधी यांची भेट घेतली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे पंजाबचे सरचिटणीस हरीश रावत आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला हेही उपस्थित होते.

 

 

 

तुघलक लेन परिसरातल्या राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यावर खैरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम आदमी पार्टी हा ONE MAN SHOW आहे. त्या पक्षात अरविंद केजरीवाल यांच्यापुढे काहीही नाही. खैरा यांनी सांगितलं की ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच्या विश्वासाचाही पुनरुच्चार केला.

 

त्यांनी आम आदमी पार्टीवर लोकशाही तत्वांचं पालन करत नसल्याचा आणि पक्षात कोणताही सुसंवाद नसल्याचा आरोपही केला. त्याचबरोबर त्यांना लोकशाहीविरोधी मार्गाने विरोधी पक्षनेते पदावरुन काढल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

केजरीवाल हे अत्यंत आत्मकेंद्री आहेत असंही खैरा म्हणाले. त्याचबरोबर अनेक परदेशस्थित भारतीयांनी पक्षाला गेल्या निवडणुकीवेळी आर्थिक मदत केली. मात्र, ती मदत पंजाबच्या लोकांपर्यंत पोहोचली नाही असा आरोपही त्यांनी आम आदमी पार्टीवर केला आहे.

 

Protected Content