यावल येथील रब्बी हंगामाच्या ज्वारी, मका आधारभुत खरेदीअंतर्गत उद्धीष्ट वाढवावे

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकरी बांधवांना शासनाच्या किमान रब्बी हंगाम २०२१ च्या ज्वारी व मक्याचे आधारभुत खरेदी किमत योजने अंतर्गत धान्य खरेदीचे उध्दीष्ठ वाढवुन मिळावे, अशी मागणीचे निवेदन भाजपा किसान मोर्चांनी दिले आहे.

ज्वारी व मक्याचे आधारभुत खरेदी किमत योजने अंतर्गत धान्य खरेदीचे उध्दीष्ठ वाढवुन मिळावे, अशी मागणीचे लिखित निवेदनाद्वारे यावलचे तहसीलदार महेश पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष कृषीभुषण नारायण शशीकांत चौधरी यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष कृषी भुषण नारायण चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या किमान आधारभुत खरेदी किमत योजने अंतर्गत यावल तालुक्यातील रब्बी हंगाम ज्वारीसाठी १४ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यास त्यांची हेक्टरी २१,९५ क्विंटलप्रमाणे ४६९ क्विंटल खरेदी होणे अपेक्षीत आहे व मक्याची तालुक्यातुन १५४ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. त्यास त्यांची हेक्टरी ४० क्विंटल प्रमाणे ८९२४ क्विंटल खरेदी होणे अपेक्षित आहे. पण शासनाकडुन यावल तालुक्यासाठी ज्वारी खरेदीचे १०० क्विंटलचे व मका १२०० क्विंटल खरेदीचे उद्धीष्ट देण्यात आलेले आहे. म्हणजेच ३६९ क्विंटल ज्वारी व ७७४ क्विंटल मका खरेदी पासुन यावल तालुक्यातील शेतकरी बांधव खरेदीपासुन वंचित राहतील, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांचे फार मोठे आर्थीक नुकसान होणार आहे.

तालुक्यातील शेतकरी बांधवांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने त्वरित ज्वारी व मका खरेदीसाठीचे वाढीव खरेदी उद्धीष्टचे आदेश काढावे जेणे करून पाऊस सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांच्या धान्याचे मोजमाप वेळेत व विहीत मुदतीत पुर्ण होईल अशा योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाकृत मागणीचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष कृषी भुषण तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण शशीकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर महाजन, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, भाजपाचे यावल शहर अध्यक्ष डॉ. निलेश गडे, परेश नाईक यांच्या शिष्टमंडळाने केली असुन या प्रसंगी नायब तहसीलदार आर डी पाटील उपस्थित होते.

Protected Content