संमेलनात अतिथी म्हणून जावेद अख्तर यांना बोलवू नये – हिंदू जनजागृती समितीची मागणी

यावल प्रतिनिधी | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून जावेद अख्तर यांना बोलविण्याचा निर्णय रद्द करावा अशी हिंदू जनजागृती समितीच्या निवेदनाद्वारे यावल येथे मागणी करण्यात आली.

मराठी भाषेत लिखाण न करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांचे मराठी साहित्यात योगदान नाही तर हिंदी आणि उर्दू साहित्य हा ज्यांचा प्रांत आहे त्यामुळे त्यांना मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित करणे अयोग्य आहे असं म्हणत जावेद अख्तर यांना बोलावण्याचा निर्णय रद्द करावा अशी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या संदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, तसेच आयोजक यांच्या नावे यावल येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसिलदार आर के पवार यांना हे निवेदन दिले. याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, शुभम भोईटे, धिरज भोळे, हर्षल भोईटे, निलेश महाजन आदी कार्यकर्त उपस्थित होते .

Protected Content