बिगुल फुंकला : गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर

 

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार गुजरातमध्य १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल ८ डिसेंबर रोजी लागणार आहे. गुजरातमध्ये एकूण ४९०८९७६५ मतदार असून राज्यातील ३.२४ लाख मतदार पहिल्यांदाच गुजरात विधानसभेसाठी मतदान करणार आहेत. राज्यात ४.६ लाख तरुण मतदार आहेत. तसेच राज्यात ९.८९ लाख ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

गुजरातमध्ये एकूण ५१७८२ पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात १४२ मॉडल पोलिंग केंद्र असणार आहेत. महिलांसाठी १२७४ पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. तर दिव्यांगांसाठी १८२ पोलिंग केंद्र तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Protected Content