राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्ताने वकिलांना फेसशिल्डचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आज वकील बांधवाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०१ फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले .

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. सर्वासाठी कोणी विविध उपक्रम राबवत आहे. परंतु, वकील वर्ग जो जीव धोक्यात घालून काम करत आहे त्याना कोणतीही मदत शासन किवा कोणी मोठ्या व्यक्तींनी केली नाही परंतु त्यामधे छोटासा एक प्रयत्न फेस शिल्ड वाटप करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वर्धापन दिनाचे आऊचित्य साधून वाटप करण्यात आले ..त्यावेळी अॅड कुणाल पवार, अॅड सचिन पाटील, अॅड प्रवीण पाटील, अॅड सचिन चव्हाण, अॅड नितीन देवराज, अॅड दिलीप पोकले, जळगाव जिल्हा बार अध्यक्ष अॅड दिलीप बोरसे, सचिव अॅड दर्शन देशमुख, माजी बार कौन्सिल उपाध्यक्ष अॅड बिपिन बेनडाले, अॅड विजय दार्जि, अॅड देवा पाटील, गणेश निंबाळकर, अक्षय वंजारी, रोहन सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content