पंजाबमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

भटिंडा वृत्तसंस्था । मोदी सरकारनं आणलेल्या कृषिविषयक विधेयकाविरुद्ध पंजाबमध्ये शेतकऱ्यांतील खदखदता असंतोष आता उघडपणे बाहेर पडू लागलाय. बादल गावातील एका शेतकऱ्यानं माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घरासमोरच विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकसभेत कृषि विधेयक संमत झाल्यानंतर शेतकरी चिंताग्रस्त आहेत, असं ‘भारतीय किसान युनियन एकता’चे राज्य सचिव शिंगारा सिंह यांनी म्हटलंय.

शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० या तीन विधेयकांना गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. या तीन विधेयकांमुळे आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

६० वर्षीय शेतकऱ्यानं सहकारी आंदोलकांना विषारी पदार्थ खाण्याबद्दल माहिती दिली. यानंतर शेतकऱ्यांना ताबडतोब अॅम्ब्युलन्स सेवेला फोन करून मदत मागितली आंदोलन स्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत शेतकऱ्याला बादल गावातील रुग्णालयात दाखल केलं. विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. लोकसभेत बहुमतानं संमत झालेल्या या विधेयकांविरोधात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घरासोर बादल गावातील शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून आंदोनल करत आहेत.

या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे विधेयक परत घेण्याची मागणी केलीय. दरम्यान केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीपरिषदेचा राजीनामा दिलाय. शिरोमणि अकाली दलानं एनडीए सरकारकडून समर्थन मागे घेतलंय.

Protected Content