निरव मोदींच्या प्रत्यार्पणाची शक्यता वाढली

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नीरव मोदीचे हस्तांतरण केले, तर त्याला न्याय मिळणार नाही असे सांगणारा एकही पुरावा नसल्याचे निरीक्षण युकेमधील कोर्टाने नोंदवले आहे.

 

हजारो कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीला यूकेमधल्या कोर्टाने झटका दिला आहे. प्रथमदर्शनी नीरव मोदी विरोधात पुरावे आहेत, असे कोर्टाने म्हटले आहे.

 

१४ हजार कोटीच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे कोर्टाने म्हटले आहे. ४९ वर्षीय नीरव मोदी व्हिडिओ लींकच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर राहिला.

Protected Content