गुवाहाटी वृत्तसंस्था | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एक खास मॅसेज घेऊन गुवाहाटी येथे गेल्याची माहिती समोर आली आहे.
आजच ना. गुलाबराव पाटील हे देखील नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली होती. यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याचे दिसून आले होते. मात्र प्रत्यक्षात ते मातोश्रीचा खास निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याचे नंतर निष्पन्न झाल्याचे वृत्त टिव्ही नाईन या वाहिनीने दिले आहे.
या वृत्तानुसार उध्दव ठाकरे यांनी आता थेट एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असून याप्रसंगी शिवसेनेचे शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार देखील उपस्थित होते. या ऑफरवर आता शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.