तरच दोन दिवसाआड पाणीपुरवठा — नगराध्यक्ष मनिषा चौधरी

 

चोपडा, प्रतिनिधी । शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ६१% पूर्ण झाले आहे फक्त ३९% काम अपूर्ण राहिले आहे. तेही काम लवकरच पूर्ण होईल. पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले की, शहरात दोन दिवसाआड पाणी सर्वत्र उपलब्ध होईल. अशी माहिती नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत तांत्रिक माहिती नगरपालिकेचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांनी दिली. नविन पाणी पुरवठा योजना जवळपास ६५ कोटींची असून ह्या योजनेचा २०% काम झाले होते तेव्हाच शहराला या योजनेचा फायदा होत होता. काही नागरिकांमुळेचं दोन दिवसाआड पाणी पुरवठा करू शकत नाही. नवीन नळ कनेक्शन घेणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिकेने नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पुरविणे ही शासनाची योजना आहे. परंतु, अंगणातुन घरात पाणी घेऊन जाण्याचे काम नागरिकांचे आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन घेणे आवश्यक आहे. नगरपालिके मार्फत ३१ जानेवारीची मुदत दिली होती. परंतु, सर्व लोकप्रतिनिधीच्या व नेत्यांच्या सूचनेनुसार नागरिकांना अजून एक संधी दयावी म्हणून ३१ मार्चपर्यंत सवलत दिली आहे. ३१मार्चपर्यंत जे थकबाकीदार आहेत त्याच्यासाठी नगरपालिकेने एकरक्कमी भरणाऱ्याला दंडात, व्याजदरात १००% सवलत देऊ आणि मोठ्या थकबाकीदारांना तीन ते पाच टप्प्यात रक्कम भरण्याची सवलत देऊ. शहरात १० हजार  नवीन कनेक्शन अपेक्षित असून अजून फक्त ४०० कनेक्शन झाले आहेत. नवीन कनेक्शनसाठी (ज्यांची अनामत जमा आहे) अश्या नागरिकांसाठी फक्त २०८० /- रुपये भरावे लागतील आणि ५०% रक्कम जवळपास २१०० /- रुपये नगरपालिका अदा करणार आहे. त्यात नगरपालिकेतर्फे सर्व साहित्य पुरविले जाणार आहे. ३१ मार्च नंतर जुनी पाईपलाईन बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन नळ कनेक्शन घेणाऱ्याला संपूर्ण रक्कम भरावी लागणार असून तसेच रस्त्याचे काम झालेले असले तर रस्ता नुकसान भरपाई व दुरुस्तीचा खर्च देखील संबंधित व्यक्तीस द्यावा करावा लागणार आहे. आज शहरात जवळपास ३ ते ४ हजार अवैध नळ कनेक्शन आहेत ह्या सर्व कनेक्शन धारकांना नवीन कनेक्शन घेणे बंधनकारक आहे. नवीन नळ कनेक्शन होत नाही तो पर्यंत १३ ते १४ कोटी रुपयांचे मंजूर झालेले रस्त्याचे काम रखडले आहे. तसेच दलीत वस्ती सुधार योजनेचे जवळपास २ कोटींची कामे रखडली आहेत. त्यामुळे आता नागरिकांनीच नगरपालिकेला सहकार्य करावे आणि सुंदर शहराचे स्वप्न सकारावे असे भावनिक आवाहन नगराध्याक्षा  मनिषा चौधरी यांनी केले. यावेळी तांत्रिक माहिती अविनाश गांगोडे,  बांधकाम विभागाचे श्री गावंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेत गटनेते जिवन चौधरी, विरोधीपक्षाचे गटनेता महेश पवार, नगरसेवक किशोर चौधरी, रमेश शिंदे, शोभा देशमुख, गजेंद्र जैस्वाल, हुसेन पठाण, नोमान काझी, अशोक बाविस्कर, चेतन चौधरी, अकिल जहागिरीदार,  वसंत पवार आदी उपस्थित होते.

 

Protected Content