सिताराम पाटील यांचे निधन

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील राजोरा येथील रहीवाशी यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा माजी सरपंच राजोरा ग्रामपंचायत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्त सिताराम काशीनाथ पाटील (वय ७० वर्ष) यांचे वृद्धपकाळाने दिनांक १ मार्च रोजी निधन झाले.

सिताराम पाटील यांनी अतिशय गुणी व हुशार राजकीय व्यक्तिमत्व म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. आज त्यांच्यावर राजोरा गावात शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुले , सुना , नांतवंडे असा परिवार असुन ते राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी गिरधर काशिनाथ पाटील यांचे जेष्ठ बांधव होते.

 

Protected Content