कोहिमा (वृत्तसंस्था) प्राण्यांसोबत होणारी क्रूरता लक्षात घेता नागालँड सरकारने राज्यात कुत्र्याच्या मांसची खरेदी-विक्री करण्यावर बंदी घातली आहे. राज्य मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव तेमजेन तॉय यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
अनेक राज्यांमध्ये कुत्र्यांचे मांस हे उच्च प्रोटिन असलेले समजले जाते. त्यामुळे लोकं ते मांस खातात. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने कुत्र्याच्या मांस विक्रीकडे संशयाने पाहिले जात होते. नागालँडमध्ये कुत्र्याचे शिजवलेले आणि कच्च अशा दोन्ही प्रकारच्या मांसवर बंदी घालण्यात आली आहे. दुसऱ्या राज्यातून कुत्रे आणताना असणारा धोका आणि प्राणी सुरक्षा कायदा १९६० अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करावे, असेही तॉय म्हटले आहे.