प्रभाग क्र. १ व २ मधील लॉकडाऊनसाठी नगरसेवक जाणून घेताय नागरिकांची मतं

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये वाढता संसर्ग रोखण्यासाठी या प्रभागातील नगरसेवकांनी एकत्र येऊन पुढील आठ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करावा का ? अशी विचारणा नागरिकांनाच केली असून नागरिकांच्या अभिप्रायानुसार तीन दिवसांनी लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांना प्रभाग क्र १ व २ मधील नगरसेवकांनी लॉकडाऊन लागू करण्याबाबत विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या प्रभागात लॉकडाऊन करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. त्यारिता आपले सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. (साधारणपणे सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ४ ते ७ या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राखीव) पुढील आठ दिवसाच्या लॉकडाऊनसाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लॉकडाउन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. प्रभागातील नागरिक यानात्याने आम्हांस आपण पुढील तीन दिवसाच्या आत या विनंतीवर आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात कारण सर्वांच्या सहमतीने प्रशासनाला पत्रव्यवहार करून लॉकडाऊनची तयारी करण्यासाठी आपले मत गरजेचे आहे असे या नगरसेवकांनी आवाहन केले आहे. हे आवाहन नगरसेविका प्रिया जोहरे, सविता नेरकर, गायत्री शिंदे, रुकसाना खान, कांचन सोनवणे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, किशोर बाविस्कर ,राजेंद्र मराठे यांनी केले आहे.

Protected Content