गलवानच्या शहिदांचे शौर्य लवकरच रूपेरी पडद्यावर

मुंबई प्रतिनिधी । भारत-चीन सीमेवरील गलवान भागात भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्यावर लवकरच चित्रपट येणार असून अजय देवगण याची निर्मिती करणार आहे.

याबाबत वृत्त असे की, लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. तर याच चकमकीमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. ही शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावर येणार असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत ख्यातनाम चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं नाही. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटातील कलावंतांची नावे सुध्दा अजून ठरविण्यात आले नसल्याचे तरण आदर्श यांनी नमूद केले आहे.

Protected Content