सामनेर येथे सर्वोदय संस्था युवकांच्या सहभागाने साकारणार “”स्मृतीवन””

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  तालुक्यातील सामनेर येथे १ जुलै या  कृषि दिनापासून सर्वोदय संस्थेच्या “हरित निर्माण” उपक्रमांतर्गत अमरधाम, मुस्लिम कब्रस्थान व गोसावी समाज दफन भूमी परिसरात नदी काठावर , रस्त्याच्या दुतर्फा “वटवृक्ष” लागवड करत “”स्मृतीवन” साकारले जात आहे.

 

सामनेर ( ता. पाचोरा )  येथील सर्वोदय बहुउद्देशिय संस्थेच्या पर्यावरण समृद्ध ग्राम संकल्पनेतून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी सातत्याने अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून पाऊल उचलले जाते.

स्मृतीवनात कृषि दिनाचे औचित्य साधत कृषि संस्कृतीत आपले आयुष्य वेचलेल्या पूर्वज, प्रियजन यांचे स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे स्वकीयांकडून वटवृक्ष लागवड करण्यात येऊन सुरुवात करण्यात आली. स्मृतीवनात २०० वृक्षांचा प्रकल्प संस्था व गावातील विविध स्थरातील सर्वधर्मीय समाज घटकांकडून या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी यशस्वी काम उभं केलं जाणार आहे. गावातील नौसेनेत, सैन्यसेवेत, पोलीस सेवेत असणाऱ्या तसेच विविध पदावर कार्यरत समाज घटकांकडून वेळोवेळी उपक्रमास भरीव योगदान लाभत आहे.

सर्वोदय “हरित निर्माण” उपक्रम अंतर्गत बारमाही वृक्ष लागवड केली जाते. समाजातील विविध घटकांच्या सहयोगावर हा उपक्रम जोमाने चालू असून यास सर्वोदय युवा स्पंदन केवळ इव्हेंटचे स्वरूप देत नसून लागवड केलेले वृक्ष जगविले जातात आजतागायत हजाराहुन अधिक वृक्ष १० ते १५ फुटांपर्यंत व त्यापेक्षा अधिक वाढले असून डौलदार झाले आहेत.

हरित निर्माण उपक्रमात वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, बेल, बकुळ व इतरही बरेच स्वदेशी प्रजातीतील वृक्ष प्रतिवर्षी लागवड केली जातात. हा उपक्रम शासनाच्या कुठल्याही मदतीविना तसेच अराजकीय स्वरूपात लोकसहभाग व समाजधुरीणांच्या मदतीवर शाश्वत स्वरूपात राबविला जात आहे.

 

वाढदिवसाचे वृक्ष, मुलीच्या जन्माचे स्वागत, वाडवडिलांच्या स्मरणार्थ वृक्ष, शहीद जवान वृक्ष, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त वृक्ष व इतरही बरेच आनंददायी व आठवणीतील क्षण अशा नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून हा उपक्रम संस्था यथाशक्तीने राबवित आहे. या कामासाठी संस्थेस कुठलीही शासकीय मदत मिळत नसल्याने मर्यादा येतात. तरी देखील विविध समाज घटकांकडून मिळणाऱ्या मदतीवर हा उपक्रम शाश्वत चालू ठेवला जात आहे. बरेच वेळा निधी अभावी मर्यादा येतात. त्यामुळे सामाजिक बांधीलकीतून कोणी मदत केल्यास सृष्टीचे सौंदर्य वाढविणाऱ्या या पर्यावरण यज्ञास हातभार लागेल. अशी सर्वोदय युवा स्पंदकडून अपेक्षा आहे.

या उपक्रमासाठी सर्वोदय युवा स्पंदन जोमाने काम करत असून त्यासाठी कृषिभूषण सागर धनाड, प्रयोगशील युवा शेतकरी चंद्रकांत साळुंखे, प्रा. राजेंद्र साळुंखे, महेंद्र साळुंखे  व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभते.

 

Protected Content