श्री संत मुक्ताई संस्थानचा वारकरी भूषण व वारकरी रत्न पुरस्कार जाहीर

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी |  संत मुक्ताई वारकरी भूषण  नरेंद्रभाऊ नारखेडे यांना व मुक्ताई वारकरी रत्न  पुरस्कार तुकाराम  महाराज  सुरंगे यांना जाहीर करण्यात आला आहे. या  पुरस्काराचे दि.१ जानेवारी नववर्ष दिनी वितरण करण्यात येणार आहे.

 

श्री संत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगरतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा वारकरी भूषण व वारकरी रत्न पुरस्कार निवड समितीने जाहीर केले असून येत्या १ जानेवारी रोजी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात येईल. वारकरी संप्रदायाद्वारे संतांचे साहीत्य दिंडी परंपरा जोपासून  सद्विचारी  सुसंस्कृत समाज घडविण्यात मोलाचे योगदान देणारा दरवर्षी मुक्ताई वारकरीभूषण पुरस्कार देण्यात  येतो मानचिन्ह , पंचवस्त्र ,शाल श्रीफळ व ११ हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच संत मुक्ताबाई फडावर जीवनभर कथा कीर्तन सप्ताह वारी  माध्यमातून मुक्ताई फड परंपरा  जोपासण्याचे कार्य  करणारास मानचिन्ह,  पंचवस्त्र ,शाल श्रीफल  ११ हजार  रोख रूपये  देवून मुक्ताई रत्न पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष  ह.भ.प.गुरुवर्य  तुकारामजी महाराज  सखारामपूर , सदस्य  रविंद्र पाटील, रविंद्र महाराज हरणे  यांनी  २०२२ चे पुरस्कार नुकतेच जाहीर केले. त्यानुसार  मुक्ताई वारकरीभूषण पुरस्कार   दिगंबर महाराज दिंडी परंपरेचे अध्यक्ष  नरेंद्र नारखेडे फैजपूर यांना व  मुक्ताई रत्न पुरस्कार जेष्ठ भागवतकार ह.भ.प. तुकाराम महाराज  सुरंगे निमखेड  ता.बोदवड  यांना जाहीर करण्यात आले आहेत.  दोन्ही पुरस्कार १ जानेवारी रोजी दुपारी १ वा. जुने मंदिर येथे श्रीगुरू चैतन्य महाराज देगलुरकर, हभप.गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूर यांचे हस्ते , प्रमुख पाहुणे म्हणून आ.एकनाथराव खडसे, खा. रक्षाताई खडसे,  आ.चंद्रकांत पाटील रविंद्र पाटील व वारकरी भाविकांचे उपस्थितीत प्रदान करण्यात येईल अशी माहीती  व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे यांनी दिली.

 

Protected Content