पायी चालणाऱ्या परप्रांतीयांमुळे कसारा घाटात वाहतुकीची कोंडी

नाशिक वृत्तसंस्था । कसारा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या मुळगावाकडे परत निघाले आहेत. त्यामुळे कसारा घाटात प्रचंड वाहतूकीची कोंडी झाली आहे. यापैकी अनेक मजूर पायी चालत जात आहेत. त्यामुळे कसारा घाटात वाहनांची मोठी रांग लागली असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

कसारा घाटात पायी चालणाऱ्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात अशा विविध राज्यांचे नागरिक आहेत. हे मजूर आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन गावाकडे निघाले आहेत. काही मजूर रिक्षा, टॅम्पो, दुचाकी किंवा मिळेल त्या गाडीने प्रवास करत आहेत. तर कित्येक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर शेकडो मजूर पायी गावाकडे चालत जात असल्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावात सोडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे, ट्रेन, बसेसची सुविधा सरकारकडून केलं जात आहे. राज्य सरकार मजुरांना घरी पाठवण्यासाठी नियोजन करत आहे.

Protected Content