Home Cities चाळीसगाव चाळीसगावच्या क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द

चाळीसगावच्या क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द

0
35


जळगाव प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत त्रुटी आढळल्यामुळे चाळीसगावातील क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून क्रिश वाईन्सचा परवाना रद्द करण्याची घोषणा केली आहे. यात नमूद केले आहे की, चाळीसगाव येथील क्रिश वाईन्सची २५ एप्रिल रोजी तपासणी करण्यात आली होती. यातील साठ्यात चुकीच्या नोंदी आढळून आल्या होत्या. यामुळे आज जिल्हाधिकार्‍यांनी क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


Protected Content

Play sound