लायन्स क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव शहरातील सर्व लायन्स क्लब अध्यक्ष व सचिवांचा सत्कार शहरातील लायन्स सभागृहात करण्यात आला. 

 

लायन्सचे जळगाव शहरात ३ क्लब असून जळगाव शहरात लायन्स क्लब गेल्या ५ दशकापासून कार्यरत आहे. केशवस्मृतीच्या स्थापनेला देखील ३० वर्ष पूर्ण झाले असून दोन्ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांची ओळख व लायन्सच्या निर्वाचीत पदाधिकाऱ्याना आगामी वाटचालीस शुभेच्छा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. केशवस्मृतीचे प्रशासकीय अधिकारी सागर येवले यांनी  गत ३० वर्षाची केशवस्मृतीची वाटचाल मांडली. लायन्स क्लबच्या अध्यक्षा किरण गांधी यानी  केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्याचा व  सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव केला. केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी सामाजिक कामात दोन संस्था कार्यरत आहेत व त्यांनी परस्परांचा गौरव करणे हे कौतुकास्पद असून लायन्स क्लबच्या कामाची शिस्त, पाठपुरावा या गोष्टी आदर्शवत असल्याचे सांगत लायन्सच्या माध्यामतून आम्हाला अनिता कांकरिया सारख्या सामाजिक कार्यकर्त्या मिळाल्या असल्याचे सांगितले.

यांचा झाला सत्कार :  नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांचा सत्कार केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील यांनी केला.   लायन्स क्लब जळगाव, रोहित अग्रवाल, रामनारायण वर्मा,   लायन्स क्लब जळगाव सेंट्रल, जगदिश जाखेटे, विनोद गांधी,   लायन्स क्लब जळगाव गोल्ड सिटी  मनोज चांडक, गणेश तोतला, मनोज मालु , रिजनल चेअरमन रविंद्र गांधी, झोनल चेअरमन जयेश ललवाणी,  माजी रिजनल चेअरमन एच. एन. जैन, यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील, मातोश्री आनंदाश्रम प्रकल्प प्रमुख  अनिता कांकरिया, मनिष मंडोरा, मनोज चांडक, किरण गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता कांकरिया यांनी तर सूत्रसंचालन भानुदास येवलेकर यांनी केले. यशस्वितेसाठी विरभूषण पाटील, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले.

Protected Content