नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीतील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र याकडे जळगावकर गांभीर्याने न घेतला संचारबंधीचे उल्लंघन करत आहे. मात्र नशिराबाद जवळील ओरिएंट सिमेंट कंपनी जनता कर्फ्यूच्या दिवसी सुरू होती. संबंधीत कंपनीच्या कामगारांची आरोग्य तपासणी करावी अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत माहिती अशी की, आरिएंट सिमेंट कंपनीने २२ रोजी पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या आदेशाचे उल्लंघन करून २४ तास कंपनी सुरू ठेवली. याबाबत सहाय्यक आयुक्त यांना ही बाब लक्षात आणूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान सहाय्यक कामगार आयुक्त यांनी गांभीर्याने लक्ष दिले असते तर कार्यवाही झाली असती. या कंपनीत गुजरात, मध्यप्रदेश येथे माल जातो. तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक येथे ट्रकने माल जातो. या ट्रकचालक आणि क्लिनर यांची आरोग्य तपासणी व्हावी, अशी मागणी नशिराबाद ग्रामपंचायतचे सदस्य प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.

Protected Content