मनपा आयुक्तांच्या दालनात राष्ट्रवादीचे गांधीगिरी आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, सचिन गोसावी । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेट म्हणून स्वच्छ जळगाव सुंदर जळगाव अशी फोटो फ्रेम भेट देण्यात आली. मात्र आयुक्तांना ही भेट नाकारल्याने त्याच्या दालना बाहेर ही फोटो फ्रेम लावण्यात आली. 

 

जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था हे खूप वाईट असून एका ग्रामीण भागात देखील गावाचे रस्त्यांची स्थिती ही चांगली असते.  शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयुक्तांना करण्यात आली.  स्वच्छ जळगाव सुंदर जळगाव असलेली फोटो फ्रेम आयुक्तांनी  न स्वीकारल्याने ही फोटो फ्रेम कार्यकर्त्यांनी  त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर  लाऊन एक अनोखे गांधीगिरी आंदोलन केले आहे.  माजी नगरसेवक अशोक लड़वांजारी, सुनील माळी,  वक्ता महानगर  माजी अध्यक्ष साहिल  पटेल, विशाल देशमुख, नबील शेख, जाहिद शाह , डॉ. रिजवान खटीक  व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी सांगितले की,  जळगाव शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न उपस्थित केला असता आयुक्तांनी अमृत योजनेमुळे रस्त्यांचे कामे करता येणार नसल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे अमृत योजेनेच्या नावाखाली रस्त्यांची कामे करण्यात येत नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर चिखल झाला आहे. यात रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी, मास्टर कॉलनी, खोटे नगर, समता नगर या परिसारतील नागरिकांना जळगाव शहरात येणे मुश्कील झाले आहे. रस्त्यांसाठी ९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर हि ९ कोटी गेले कुठे ?  हे नगरसेवकांच्या खात्यात गेले किंवा अन्य कोणाच्या खात्यात गेले याचा जाब आयुक्तांना विचारला असता  आयुक्तांनी थातूरमातूर उत्तर दिल्याने आमचे समाधान झाले नसल्याचे मत अशोक लाडवंजारी यांनी मांडले. शहरातील प्रत्येक भागातील खड्डेमय रस्त्यांचे फोटो काढून त्याचा एकच फोटो तयार करून तो आयुक्तांना भेट देणार होतो, परंतु त्यांनी ती भेट नाकारल्याने त्यांच्या दालनाबाहेर ही फ्रेम लावणार असल्याचे अशोक लाडवंजारी यांनी स्पष्ट केले. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/547022316669684

 

Protected Content