जळगावात संचारबंदीचे उल्लंघन; पोलीसांकडून कारवाई (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र याकडे जळगावकर गांभीर्याने न घेतला संचारबंधीचे सरळसरळ उल्लंघन करत आहे. शहरातील ठिकठिकाणच्या चौकात पोलीसांनी चोख भूमीका बजावली. यावेळी अपात्कालीन सेवा वगळता इतर नागरीकांची मोठ्या प्रमाणावर चौकशी करून कारवाई करत होते.

टॉवर चौक
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संचारबंदीची उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या तरूणींची चौकशी केली. ऑफीसला येवू देण्याच्या बहाणा दाखविला जात होता. मात्र संचारबंदीत कोणतेही ऑफीस बंद ठेवण्यात आले असल्याने त्यांनी घरी माघारी पाठविण्यात आले.

भिलपूरा चौक
शहरातील अतिशय संवेदनशील असलेले भाग भिलपूरा. या भागात सर्व धर्मिय समाज बांधव राहतात. आज संचारबंदीतही नागरीकांनी घरी बसने पसंत केली नाही. नाइलाजास्तव पोलीसांनी खाक्या दाखविण्यात आला. या भागातील काही तरूणी ट्रिपल सिटने दुचाकीने जात असतांना पकडले. या तिघा तरूणांनी पोलीसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील पोलीसांनी हानून पाडला आहे.

सुभाष चौक
शनी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.डी.ससे यांच्या उपस्थितीत बाजारपेठतील गजबजलेला भाग सुभाष चौकात ठाण मांडून होते. यावेळी व्यापाऱ्यांची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने मोठ्या प्रमाणावर बंद होते. शहरातील काही भागातील नागरीकांनी तोंडाला मास्क न लावता शहरातून मुक्तपणे संचार करत होते. त्यांना आलेल्या रोडवरून परत माघारी पाठविण्यात आले.

शर्ट काढून तोंडाला बांधण्याची शिक्षा
शहरात मोठ्या प्रमाणावर दुकाने बंद होती. घरात असलेल्या आजारी रूग्णांना गोळ्या औषधी घेण्यात बाहेर पडलेल्या नागरीकांनी तोंडाला मास्क बांधलेले नव्हते. त्यांना शिक्षा म्हणून अंगावरील शर्ट काढून तोंडाला बांधायला लावले. काहींना दुचाकी थांबवून त्यांच्याजवळी आयकार्डची चौकशी सुरू होती. ज्यांच्याकडे आयकार्ड किवा ओळखपत्र नसेल त्यांना काठीचे दोन फटके देवून सोडून देण्यात येत होते.

चिमुकलीकडून मदतीचे दर्शन
सिंधी कॉलनी परीसरातील संत कंवरराम गेटजवळ आणि सिंधी कॉलनीच्या मेन गेटजवळ देखील पोलीसांनी चांगला पहारा दिला होत. यावेळी जवळच तांबापूरा हा संवेदनशिल भाग असल्यामुळे पोलीसांची उपस्थिती वाढविण्यात आली होती. सिंधी कॉलनी गेट जवळ एका चिमुकलीने पालकांच्या मदतीने आरोग्यासाठी कर्तव्यावर असल्याने त्यांना नास्ता आणि चहा देण्यात आले.

संवेदशील असलेला भाग वगळता इतर भागात सर्व नागरीक आपापल्या घरात राहणे पसंत केले. मध्यमवर्गीय नागरीक यांनी कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता एका मागे एक निघायला सुरूवात करत होते. दुपारी २ वाजेपर्यंत पोलीसांनी आपली भूमीका चोखपणे पाळली. दुपारी उन्हाची तिव्रता वाढत असल्याने रस्ते ओस पडले होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/145940606776481/

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/209425517066208

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/238265810638784/

Protected Content