जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून न देता सर्वजनिक नवरात्रोत्सवात मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन सर्वांनी करून नवरात्रोत्सव साजरा करावा. तसेच कोणत्याही मिरणवणूकांवर बंदी असून एकंदरीत उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत केले.
खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत
१. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिकेची पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील.
२. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी कमी व सुसंगत असे मर्यादित मंडप उभारावा.
३. या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करावयाचा असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट कमी प्रमाणात करावी.
४. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी.
५. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी पर्यावरणपूरक मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची किंवा पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
६. नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.
७. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असून त्या ऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबावावे.
८. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी
९. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्यास भर असावा.
१०. देवीच्या मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/373915450299558/