नगरोत्थान अभियानांतर्गत प्रकल्पांना तांत्रिक मान्यता द्यावी – महापौर भारती सोनवणे

जळगाव, प्रतिनिधी । शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर निधीपैकी ४२ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा झाला असून उर्वरित ५८ कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता द्यावी यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवले आहे.

जळगाव शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान महाअभियानांतर्गत १०० कोटींचा विशेष निधी मंजूर केला होता. कामांच्या निविदेला उशीर झाल्यानंतर सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कामांना शासनाने स्थगिती दिली होती. गेल्या आठवड्यात शासनाने स्थगिती उठविल्यानंतर ४२ कोटींची कामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी पाठपुरावा केला होता. ४२ कोटींच्या कामाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर उर्वरित ५८ कोटींच्या कामाच्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवले आहे. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांशी फोनद्वारे देखील चर्चा केली आहे.

Protected Content