‘त्या’ ठिकाणी लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी : गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर (वृत्तसंस्था) ज्या शहरात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत, तेथे लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती राज्याचे : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. राज्याचा गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख देखील हजर होते. यानंतर अनिल देशमुख यांनी माहिती देतांना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात झालेल्या चर्चेनुसार ज्या शहरात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत, तेथे लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र, जे शहर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत, तिथे काही प्रमाणात सूट मिळू शकते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः याबद्दल घोषणा करतील, अशीही माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

Protected Content