अर्णव गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल करा : पारोळा तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

 

पारोळा, प्रतिनिधी । अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संदर्भात बदनामीकारक व निंदाजनक अपशब्द वापरून बदनामी करणाऱ्या अर्णव गोस्वामी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिचोली येथे साधूंच्या झालेल्या निर्घृण हत्याप्रकरणांत आर रिपब्लिक टी. व्ही. चॅनेलचे वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांनी एका चर्चेदरम्यान, अर्णव गोस्वामी यांनी काँग्रेस पक्ष व पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलून जाती जातीमध्ये तेड निर्माण होईल असे शब्द त्यांनी वापरलेले आहे. हिंदु मुस्लीम व खिश्चन धर्माच्या विरोधात जातिय वातावरण तयार करुन दंगली भडकवण्याचे काम आणव गोस्वामी करित आहे. सध्या जगभरात कोरोना आजाराशी संपूर्ण जग सावरण्यासाठी प्रयत्न करत असताना अशावेळी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून दुही माजवण्याचा शांतता भंग करण्याच्या अर्णव गोस्वामी यांच्या प्रयत्न दिसतो तरी आर रिपब्लिक टीव्हीवरील त्या भागाचे चित्रीकरण काढून टाकण्यात यावे. समाजा समाजामध्ये भांडण लावणाऱ्या आर रिपब्लिक टी. व्ही. चॅनेलचे वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांचे विरुद्ध फौजदारी स्वरूपाच्या इंडियन पिनल कोड प्रोसेस नुसार गुन्हा दाखल करण्यात यावे अशी पारोळा तालुका काँग्रेस कमिटी आग्रही मागणी आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष व खासदार सोनिया गांधी यांचे बद्दल अपशब्द बोलणाऱ्याचा पारोळा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी सोशल डिस्टेनसिंगच्या नियमचे पालन करून निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार पंकज पाटील, पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पिरन कुमार अनुष्ठान,काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी, सार्वजनिक वितरण रेशन कमिटी चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भरत चौधरी उपस्थित होते.

Protected Content