बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील धोंडखेड शेत शिवारातील विहीरीतून इलेक्ट्रीक पानबुडी मोटार व वायर चोरी केल्याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आलाय.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धोंडखेड येथील शेतकरी रामसिंग अजबसिंग पाटील (वय-५३) यांचे धोंडखेड शिवारात शेत गट क्रमांक ९९ शेतात एक विहीर आहे. ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान त्यांच्या विहिरीतून २ हजार रूपये किंमतीची इलेक्ट्री पाणबुडी मोटार आणि १ हजार रूपये किंमतीची इलेक्ट्रीक वायर असा तीन हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरून नेला. गावातील काही सुत्रांकडून रामसिंग पाटील यांनी कळाले की, त्यांच्या गावातीलच राहणारे पांडूरंग शांताराम सुनसकर आणि गजानन दयाराम सुनसकर दोन्ही रा. धोंडखेड ता.बोदवड यांनी चोरून नेल्याचे कळाले. त्यानुसार रामसिंग पाटील यांनी बोदवड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. बोदवड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.