दुचाकी अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ येथे दोन दुचाकींच्या धडकेत दुचाकीवरी दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथील द्वारकानगर येथे चुडामण मुरलीधर वानखेडे वय ४९ हे वास्तव्यास आहेत. चुडामण वानखेडे हे रविवार २५ जून रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास कपडे घेण्यासाठी जळगावात आले होते, यादरम्यान दुचाकीने जात असतांना नवीपेठेत दुसऱ्या एका दुचाकीने वानखेडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, धडकेतनंतर दुचाकीस्वार पळून गेला, या अपघातात चुडामण वानखेडे तसेच त्यांची पत्नी मनीष वानखेडे या दोघांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारा चुडामण वानखेडे यांच्या तक्रारीवरुन धडक देणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुनंदा तेली ह्या करीत आहेत.

Protected Content