Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील कृषी परिसरात बैलपोळ्याचा उत्साह; सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त

डॉ. उल्हास पाटील कृषी परिसरात बैलपोळ्याचा उत्साह; सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात शेती संस्कृतीचे जतन आणि शेतकऱ्याच्या खऱ्या साथीदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सर्जा-राजाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून त्यांची आरती करण्यात आली.

शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा बैलपोळ्याच्या माध्यमातून जपली जाते. याच भावनेतून कृषी महाविद्यालयाच्या परिसरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. सजवलेल्या बैलांची पूजा करून उपस्थितांनी त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी बैलांना रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट तसेच पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आले होते. सजवलेल्या सर्जा-राजांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनीही या पारंपरिक सणात उत्स्फूर्त सहभाग घेत शेती आणि ग्रामीण संस्कृतीशी असलेले आपले नाते अनुभवले.

या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी, संचालक सतीश सावके, डॉ. मिलिंद तायडे, प्रा. सुशील चव्हाण, परिचारिका अधीक्षक मनिषा खरात, प्रा. कीर्ती पाटील, डॉ. गुणवंतराव सराडे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, प्रशासन अधिकारी चेतन चौधरी, देवेंद्र भंगाळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैलपोळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व समजावे, तसेच कृषी संस्कृतीशी त्यांची नाळ अधिक घट्ट जोडली जावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्याबरोबरच भारतीय कृषी परंपरा, संस्कृती आणि शेतीशी जोडलेल्या भावनिक नात्याची जाणीव व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम साधत आयोजित करण्यात आलेल्या या बैलपोळ्यामुळे महाविद्यालयीन परिसरात कृषी संस्कृतीचे दर्शन घडले. शेतकऱ्याच्या कष्टात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


Protected Content

Play sound