चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी |येथील आगार प्रमुखांनी आपल्या खुर्ची मागील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनाधिकाराने काढून टाकल्याने धार्मिक भावना दुखावल्या आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काल ३ जूलै रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास आगार व्यवस्थापक मयूर पद्माकर पाटील यांनी खुर्चीच्या मागे लावलेला महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनाधिकाराने काढून टाकला. याबाबत कारण विचारले असता, आगार प्रमुखांनी ‘मला माझ्या कार्यालयात महापुरुषांचा फोटो चालत नाही. त्यामुळे मी फोटो काढून टाकला आहे.” असे उत्तर दिले. यामुळे येथील आम आदमी पार्टीचे अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष व वाहतूक नियंत्रण आगार उदय काशिनाथ सोनवणे यांच्या मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या गेल्या आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून याबाबत भारतीय दंड संहिता १८६० चे कलम २९५ के १६६ अन्वये गुन्हा दाखल होणेबाबत शहर पोलिसांना आज निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी ॲड. राहुल बी. जाधव, तालुकाध्यक्ष, उदय सोनवणे, जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती विभाग यासीन खान, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, संजय निकम, जारो कुरेशी, संजय निकम, मुजाहिद खान, महेश चव्हाण, भागवत चव्हाण, राहुल मोरे, गफ्फार कुरेशी, अबुजर कुरेशी, नंदेश परदेशी, यांच्यासह अनेक आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.