Home क्राईम तरूणाला मैत्रिणीसोबत जंगलात फिरणे पडले महागात !

तरूणाला मैत्रिणीसोबत जंगलात फिरणे पडले महागात !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मैत्रिणीसोबत जंगलात फिरणाऱ्या तरूणाला दमदाटी करून अनोळखी चार जणांनी मारहाण करून दोन मोबाईल, ६ हजारांची रोकड आणि कानातील सोन्याचे दागिने असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील महाकाल मंदीराजवळील जंगलात घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळु दिनकर वाघ (वय-२८) रा. खडकोद ताजि.बऱ्हाणपूर मध्यप्रदेश हा तरूण ३ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मैत्रिणीसोबत मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव येथील महाकाली मंदीर परिसरातील जंगालत फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी मंदीर परिसरात दोघेजण गप्पा मारत असतांना तिथे अनोळखी चार जण आले. त्यांनी दोघांना मारहाण करत दोघांजवळील मोबाईल, ६ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला. हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.


Protected Content

Play sound