केमीकल कंपनीच्या आवारातून दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील केमीकल कंपनीच्या आवारातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज अर्जून सोनवणे (वय-२३) रा. दिनगर नगर, आसोदा ता.जि.जळगाव हा तरूण १ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील केमीकल कंपनीत कामाला आहे. त्याठिकाणी त्याने त्यांची दुचाकी (एमएच १९ डीसी ९६४२) हा पार्किंग करून लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांने पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहे.

Protected Content