Home क्राईम २० लाखाच्या दारूसह दोन जणांना अटक; गडचिरोली पोलिसांची कारवाई

२० लाखाच्या दारूसह दोन जणांना अटक; गडचिरोली पोलिसांची कारवाई


गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गडचिरोली जिल्हयात पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईत १ कोटीपेक्षा जास्त किंमतीची दारूच्या बाटल्या बुलडोझरने नष्ट केल्या आहे. यासोबतच ज्या वाहनांतून दारूची वाहतूक होत होती. ते वाहनही जप्त केले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्हयातील आल्लापल्ली येथे योगेश अरूणसिंग चव्हाण हा देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी घटनास्थळी पोहचातच आरोपी योगेश चव्हाण याच्या घरासमोरील चारचाकी वाहनात ४ लाख पेक्षा जास्त किंमतीच्या दारूच्या पेटयांनी भरलेला मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर दोन इसम आलापल्ली येथे चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्या परिसरात वाहनाची पाहणी करत होते. दरम्यान त्यांना दोन इसम संशयास्पद हालचाल करतांना दिसून आले. त्यावेळी, दोघांची विचारपूस करण्यासाठी पोलीस त्यांच्याजवळ जात असताना सदर दोन्ही इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यामुळे पोलिसांनी वाहनाजवळ धाव घेऊन दोघांनाही जागीच पकडले. वाहनामध्ये देशी विदेशी कंपनीची अवैध दारु मिळून आल्याने वाहनासह एकूण किंमत 15,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, सदर मुद्देमाल किशोर डांगरे रा. आलापल्ली याचा असून सुलतान शेख रा. चंद्रपुर हा त्याचा पार्टनर असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यावेळी पोलिसांनी गुड्डु वर्मा व अरविंद हिरामण भांडेकर या दोघांना अटक केली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींविरुध्द पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound