पहूर ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धनगर समाजाच्या विविध मागण्या मंजूर करण्याच्या हेतूने संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य आक्रोश मेळाव्यात धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांनी केले आहे.
धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, समाजातील मेंढपाळ करणाऱ्या बांधवांसाठी मेंढपाळ पालन पोषण मंडळासाठी ३००० कोटीचा निधी मंजूर करावा या प्रमुख मागण्यासह धनगर समाजातील विविध प्रलंबित मागण्या शासन दरबारी आवाज उठवण्याच्या उद्देशाने सरकारला घाम फुटावा यासाठी चलो संभाजीनगरची हाक देण्यात आली आहे. सर्व सकल धनगर समाज बांधवांनी एकत्रित लढा देण्यासाठी सरकारला धनगर समाजाची एकजुटीची वज्रमुठ दाखवण्यासाठी उद्या रविवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हरसिद्धी माता मंदिर हरसुल संभाजीनगर येथे धनगर आक्रोश मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. मेळाव्याला जाण्यासाठी पहूर येथून वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांनी व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, जिल्हा अध्यक्ष संदीप साळवे, जिल्हा सचिव गणेश पांढरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पांढरे यांनी केले आहे.