सावखेडा सिम येथे आदिशक्ती दुर्गामातेची महाआरती

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथे नवरात्रोत्सवानिमित्त सातपुडा मित्र मंडळ यांच्या वतीने गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हस्ते आदीशक्ती दुर्गामाताची महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

यावेळीस गावातील लेवा समाज, मराठा समाज, बडगुजर समाज, आदीवासी तडवी समाज, मातंग समाज, आदीवासी पावरा समाज, कोळी समाज व मेहेतर समाज अश्या सर्व जाती व समाजाचे ५१ जोडप्यांच्या हस्ते प्रवीण कुलकर्णी या ब्राह्मणांनी विधिवत पूजा करून आरती केली. आदीवासी तडवी समाज्याच्या हसीना याकूब तडवी यांनी नवरात्रीचे ९दिवसाचे उपवास केलेले आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचे पती याकूब रशीद तडवी यांचेसह आरतीत सहभाग घेतला. जगावर असलेलं कोरोना विषाणु संसर्ग महामारीचे संकट व आपल्या परिसरात अन्नदाता शेतकरी यांच्यावर अतिवृष्टीमुळे आलेलं ओल्या दुष्काळाचे संकट लवकर दूर होऊन सर्व जनता सुखी समाधानी व गुण्या गोविंदाने नांदू दे अशी प्रार्थना आदिशक्ती दुर्गामाते कडे सर्वांनी केली याप्रसंगी आयोजीत करण्यात आलेल्या पुजाअर्चना या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा संगायोचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांनी सपत्नीक सहभाग घेतला व तसेच सर्व जातीधर्माच्या लोकांनी व सावखेडा सिम गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!