पहूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पहूर ता. जामनेर (वार्ताहर) । येथील शिवसेना कार्यालयात पहूर येथील शिवसेना शहर शाखेतर्फे हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शिवसेना शहर कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात शिवसेना नेते व माजी शहरप्रमुख सुकलाल बारी, तालुका प्रवक्ते गणेश पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रावर मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरप्रमुख संजय तायडे, शहर संघटक विकास जाधव, शेतकरी सेना संघटक भाऊराव गोंधनखेडे, वडाळी शाखाप्रमुख सुधाकर शिनगारे, रमेश बनकर, विभाग प्रमुख दगडू पाटील, अजय जाधव, पुंडलिक भडांगे, शुभम घोलप, कैलास जाधव, राहुल जाधव, मीडिया सेल प्रमुख मुकेश जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे तर आभार शहरप्रमुख संजय तायडे यांनी मानले.

Protected Content